
Local UpdatesPune1 min read
एक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ! पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@metrorailpune)
Shared on NeshSource: X (@metrorailpune)
Read originalएक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ! पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे आता पुणे मेट्रोच्या एकाच ॲपद्वारे पुणे मेट्रोच्या दोन्ही सेवांचे तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ होणार असून, डिजिटल प्रवासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भा. प्र. से.) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. #PuneMetro #IntigratedDigitalTicketing #PuneMetroApp #OnlineTicketing #UseMetro
This report has not been independently verified by Nesh.
