Local UpdatesMumbai1 min read
RT by @MMMOCL_Official: युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथे डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी प्रस्तावित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मागील व्यापक दृष्टिकोन मांडला. मुंबई महानगर
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MMRDAOfficial)
Shared on NeshSource: X (@MMRDAOfficial)
Read originalयुनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथे डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी प्रस्तावित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मागील व्यापक दृष्टिकोन मांडला. मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील गरजांचा वेध घेणे, विकासाच्या संभाव्य परिणामांचे मूल्यमापन करणे आणि जागतिक दक्षिणेतील इतर शहरांनाही स्वीकारता येतील अशा प्रभावी उपाययोजना विकसित करणे, हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असेल. यूसीएलमधील ग्रँड चॅलेंज ऑफ द क्लायमेट क्रायसिसच्या अंतर्गत जोखीम व आपत्ती निवारणाचे प्राध्यापक व हवामानविषयक प्रशासनाचे प्रमुख प्रा. श्री. मार्क पेलिंग यांच्यासोबत झालेल्या विशेष संवादात डॉ. मुखर्जी यांनी या संकल्पनेच्या केंद्रस्थानी असलेले एक महत्त्वाचे तत्त्व अधोरेखित केले ते म्हणजे, “विकासामुळे कोणाचेही जीवनमान खालावता कामा नये.” या दृष्टिकोनातून विकासामुळे पर्यावरणीय शाश्वतता, आरोग्य, प्रवासासाठी लागणारा वेळ आणि संधींपर्यंतची उपलब्धता यांवर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करणे अपेक्षित आहे. तसेच भविष्यातील गरजांचे स्वरूप ओळखून त्या दैनंदिन जीवनातील आव्हाने बनण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी लंडन येथे आयोजित या संवादातून एमएमआरडीए आणि यूसीएल यांच्यातील सामंजस्य कराराचा गौरव करण्यात आला. यावेळी एमएमआरडीए, यूसीएल आणि क्रॉसरेल इंटरनॅशनल यांच्या सहभागातून प्रस्तावित असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या संकल्पनेवरही चर्चा झाली. एमएमआरडीएसाठी या जागतिक सहकार्याचे खरे यश केवळ ज्ञानाच्या देवाणघेवाणीत नाही तर, त्यातून प्रत्यक्ष जमिनीवर घडून येणाऱ्या सकारात्मक बदलांमध्ये आहे.
This report has not been independently verified by Nesh.
